सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी वरुणराजा मुसळधार कोसळत आहे. तर काही ठिकाणी पावसाने मोठी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर राज्यातील अनेक भागात अजून पाऊस सुरु झाला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. मात्र पूर्व विदर्भात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात सातत्याने हवामान विभागाने विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे. मात्र उपराजधानी नागपूरसह अनेक जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. मात्र पूर्व विदर्भात अजूनही पावसाचा थांगपत्ता नाहीये. अजूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली आहेत. तसेच धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे सध्या अनेक गावांमध्ये पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला आहे. मात्र नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे.