आज म्हणजेच, गुरुवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. 14 व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेले जागांचे बळ पाहता आजपासून सुरु होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.या अधिवेशनात सरकारच्या वतीने अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर उद्या 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.
अल्पावधीतच विधानसभा निवडणूक येत असल्याने राज्य सरकार आणि विरोधक अशा दोघांनाही या कार्यकाळातील विधिमंडळाच्या विधानसभा समभागृहात कामगिरी दाखविण्याची ही पहिली संधी असेल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठी कसोटी लागणार आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, ड्रग्ज, अल्पवयीन मुलांकडून होणारे वाहन अपघात, नीट परीक्षा, महागाई, बेरोजगारी अश्या अनेक मुद्द्यांवरून घमासान होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार कोणती विधेयके आणतं, कोणत्या विधेयकांना मान्यता देते याबाबत प्रचंड उत्सुकता असणारआहे.
विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांचे महायुती सरकार या अधिवेशनामध्ये मोठ्या घोषणा करेल असेही वर्तवले जात आहे.