देशामध्ये नव्या सरकारनंतर लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रांमध्ये नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी पार पडले. विशेष अनेक सदस्यांनी शपथविधी दरम्यान विविध भाषांना प्राधान्य दिलेले दिसून आले . यामध्ये संस्कृत, हिंदी, डोंगरी, ओडीसी या भाषांचा समावेश होता.विशेष म्हणजे यावेळी २२ नवनिर्वाचित सदस्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. जे देशातल्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करतात.
ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.जे उत्तर गोवा मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झाले आहेत.
तसेच भाजप खासदार देवुसिंह चौहान (गुजरातमधील खेडा), हेमांग जोशी (गुजरातमधील वडोदरा), आणि विश्वेश्वर हेगडे (कर्नाटकमधील उत्तर कन्नड) यांच्यासमवेत प्रथमच खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. तसेच हरियाणातील सोनीपतमधून काँग्रेसचे खासदार सतपाल ब्रह्मचारी हे संस्कृतमध्ये शपथ घेताना दिसून आले.
जाणून घ्या संस्कृतमध्ये शपथ घेतलेल्या इतर नवनिर्वाचित सदस्यांची नावे
मध्य प्रदेश:-८
1. श्रीमती संध्याराय:- भिंड
2. श्रीमती लतावनखेडे- सागर
3. श्री जनार्दन मिश्रा:- रेवा
4. श्री राजेश मिश्रा:- सिद्धी
5. श्री रोडमलनगर:- राजगड
6. श्री महेंद्र सोळंकी- देवास
7. श्री गजेंद्र सिंह पटेल:- खरगोन
8. श्री दुर्गादास उईके- बतुल
आसाम प्रांत:
1. दिलीपसायकिया
छत्तीसगड
1. श्री चिंतामणी महाराज:
आंध्र प्रदेश:
1. श्री कृष्ण प्रसाद तेणेती
उत्तर प्रदेश
1. श्री अरुण गोविल
2. डॉ. महेश शर्मा
3. डॉ. स्वामी सच्चिदानंद हरी साक्षी महाराजा
ओडिशा
1. श्री प्रतापचंद्र सारंगी
राजस्थान
1. डॉ. मननलाल रावता