लोकसभेच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सदस्यांना संबोधित केले. आजच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशातील जनतेने तिसऱ्यांदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिले आहे. जम्मू काश्मीरमधील नागरिकांनी सर्वाधिक मतदान केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन देखील आपल्या अभिभाषणात केले. तसेच देशात झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून देखील त्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.
१८ व्या लोकसभेच्या अभिभाषणात बोलताना राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू म्हणाल्या, ”आताचे सरकार देशात होत असलेले पेपर फुटीच्या प्रकरणाबाबत संवेदनशील असून, त्याचा तपास करण्यासाठी वचनबद्ध आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा देखील मिळाली पाहिजे. माझे सरकार देशातील तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी व ती साध्य करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत आहे.”
पेपर फुटीच्या घटनेबाबत बोलताना मुर्मू म्हणाल्या, ” आताचे सरकार देशात होत असलेले पेपर फुटीच्या प्रकरणाबाबत संवेदनशील असून, त्याचा तपास करण्यासाठी वचनबद्ध आहे. याआधी देखील काही राज्यात पेपर फुटीचे प्रकरण घडले होते. असे घडू नये यासाठी राजकारण बाजूला ठेवून सक्षम पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच संसदेने पेपर फुटीच्या विरुद्ध एक सक्षम असा कायदा देखील तयार केला आहे. परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सरकार काम करत आहे.”