लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी अनेकांच्या घेतलेल्या शपथ या चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी मराठीतून, काही जणांनी हिंदीत शपथ घेतली. निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेऊन सुजय विखे पाटील यांचे आव्हान पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. मात्र या सर्वांमध्ये हैदराबादचे एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी घेतलेली शपथ वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. दरम्यान अमरावती लोकसभेच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पात्र लिहून ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
लोकसभेच्या अधिवेशनात शपथ घेताना असुद्दीन ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली होती. यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. त्यांच्यावर टीका केली जात आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांना पत्र लिहून असुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी पत्रातून केली आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांनी ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईन अशा दिलेल्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम १०२/१०३ नुसार त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राणा यांनी पत्रातून केली आहे. जय पॅलेस्टाईनची घोषणा ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घटक बाब असून ओवेसी यांनी भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान काल आणि आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना जय पॅलेस्टाईन घोषणा दिल्याने वाद उभा राहिला. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मंगळवारी (२५ जून) संसदेत खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र प्रोटेम स्पीकर यांनी हा शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकला आहे.