पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राव यांच्या नेतृत्वाची आणि शहाणपणाची प्रशंसा करताना, मोदींनी त्यांना सरकारने नुकत्याच दिलेल्या भारतरत्नचाही उल्लेख केला आहे . पंतप्रधान पुढे म्हणतात की, “मी माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव गरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पण करत आहे. ते नेहमी त्यांच्या नेतृत्व आणि चातुर्यासाठी स्मरणात राहतील. त्यांनी देशासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत.या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही त्यांना भारतरत्न प्रदान केला हा आमच्या सरकारचा सन्मान आहे”.
https://x.com/narendramodi/status/1806530899812479150
1921 मध्ये जन्मलेले राव हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख सदस्य होते ज्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 1991 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. राव यांची त्यांच्या कार्यकाळातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे आर्थिक सुधारणांचा परिचय ज्याने “लायसन्स-परमिट राज” मोडून काढले आणि खाजगी उद्योगांना प्रोत्साहन दिले.
या सुधारणा राव यांच्या निर्णयांचे फलित मानल्या जातात आणि ज्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करून त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे.