राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात सुरवात केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झालेले दिसून आले.
विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या आहेत तसेच देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली. असे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे .
हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी विठ्ठलाला प्रमाण केले असून वारकऱ्यांच्या दिंडीसाठी भरीव मदत दिल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्ताव पाठवत आहोत. प्रति दिंडी २० हजार रुपयांचा निधी. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची मोफत तपासणी करू, तसेच विनामूल्य औषधें त्यांना दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
२०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली आहे असल्याने वारकऱ्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी असणार आहे.