सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली आहे. दरम्यान राज्यातील महिलांसाठी अजित पवार व राज्य सरकारने आणखी एक योजना जाहीर केली आहे.
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाअखेर ३ सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचा ५२ लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे. तसेच राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांना दिल्या जाणार आहेत. बचत गटाच्या निधीत १५ हजार रुपयांमध्ये अजून वाढ करून ३० हजार इतकी वाढ केली जाणार आहे. तसेच व्यवसायिक शिक्षणामध्ये ८ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचा शासनाचा विचार असल्याचा अजित पवारांनी सांगितले.