पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताचे प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटलेले पाहायला मिळाले. आज पोर्शे अपघात प्रकरणावर लक्षवेधी झाली. त्यात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य प्रकारे उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. पोर्शे अपघातात आरोपीच्या वडिलांपासून ससूनहॉस्पिटलमध्ये आरोपीला वाचवण्याचे कसे प्रयत्न झाले याबाबत फडणवीसांनी निवेदन दिले.
पुण्यात ज्या वेळेस पोर्शे कार अपघात घडला. त्यावेळेस तो आरोपी प्रतितास ११० किमीच्या वेगाने गाडी चालवत असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. हे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आरोपी किती वेगाने वाहन चालवत होता हे स्पष्ट होत आहे. आरोपीचे घरापासून बारमध्ये जाण्यापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. बारमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तेथील बिल जप्त केले आहे. त्यामुळे गृह विभागाकडे आणि पोलिसांकडे तांत्रिक व कायदेशीर पुराव्यांची कमतरता नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.
पोर्शे अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या काही चुका झाल्या. त्या म्हणजे अपघात झाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला जेव्हा पोलीस ठाण्यात आणले तेव्हाच मेडिकल साठी पाठवायला हवे होते. पण त्यांनी त्याला सकाळी ८.३० वाजता मेडिकलची नेले. अपघातानंतर ३०४ कमळ लावले जाते मात्र पोलिसांनी ३०४ अ कलम लावले. त्याची नोंद केस डायरीत आहे. वरिष्ठांना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कळवले नाही. अशा काही चुका झाल्या. कर्तव्यात कसून करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर पार्ट अटक करणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याची बालसुधारगृहातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. त्यानंतरच त्याची बालसुधारगृहातून सुटका झाली असून, त्याचा ताबा त्याच्या आत्येकडे देण्यात आला आहे. दरम्यान या आरोपीने भरधाव वेगाने कार चालवत दोन निष्पाप माणसाचा बळी घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.