‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्याचा कर्करोग आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत विविध प्रकारच्या बातम्या येत होत्या, अशा परिस्थितीत अभिनेत्रीने स्वतः पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे .
हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे – ‘सर्वांना नमस्कार ! काही अफवा आहेत ज्यांचा मी खुलासा करू इच्छिते . माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी करणाऱ्या सर्व लोकांसोबत मला काहीतरी महत्त्वाचे शेअर करायचे आहे. मला स्टेज 3 चा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.
हिनाने पुढे लिहिले की, ‘मी या आजारावर मात करण्यास तयार आहे. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि मी यावर मात करण्यासाठी शक्य ते सर्व करण्यास तयार आहे. कृपया या कठीण काळात माझ्या गोपनीयतेचा आदर करा. या कठीण प्रवासात तुम्ही तुमचा पाठिंबा, सल्ला आणि अनुभव शेअर करू शकता.
या कठीण काळात हिनाचे कुटुंब तिच्यासोबत आहे.त्यामुळे मी या आजारातून नक्की बरी होईन असा मला विश्वास आहे, असेही हिना म्हणाली आहे.
हिना खानच्या तब्येतीची माहिती शेअर केल्यानंतर तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच तिचे इंडस्ट्रीमधले सहकलाकार सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत आहेत आणि तिला काळजी घेण्याची विनंती करत आहेत. . शार्दुल पंडित, रोहन मेहरा, पायल गौर, सायंतानी घोष, लता सभरवाल, हेली शाह, रश्मी देसाई, आश्का गोराडिया, उदय टिकेकर यांनी हिनाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
एप्रिलमध्ये हिनाने सोशल मीडियावर खुलासा केला होता की तिला गंभीर आरोग्य समस्या आहेत पण त्यावेळी तिने कॅन्सरबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. दरम्यान, तिला काही दिवस रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. तिने हॉस्पिटलमधील तिचे फोटोही शेअर केले आहेत.