पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात आता पुन्हा एक हिट अँड रनचे प्रकरण घडले आहे. पुण्यात एका अल्पवयीन मुलाने वानवडी येथे एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात टँकरची धडक होऊन झाल्याचे समोर आले आहे. केवळ १४ वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्याने टँकर चालवताना अनेकांना धडक दिली आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेलाही या मुलाने धडक दिली आहे. सकाळी ६ ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
पोर्शे अपघाताची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलाने अशा प्रकारचा अपघात केला आहे. महत्वाची बाब म्हणजे केवळ १४ वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. या अपघातामध्ये काही मुले आणि महिला जखमी झाल्या आहेत. त्यानंतर तेथील नागरिकांनी हा टँकर पकडला असून मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुण्यात सध्या अपघातांची मालिका घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मार्केटयार्ड येथे मोठ्या ट्रकने एका महिलेला चिरडले होते. कात्रज येथे बसने धडक दिल्याने एका तरुणीचा जीव गेला होता. मात्र अनेक अपघात होत असताना काही ठिकाणी अल्पवयीन मुले देखील वाहने चालवताना दिसत आहे. आज तर चक्क केवळ १४ वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्याने अनेकांना धडक दिली आहे. हा प्रकार वानवडी येथे घडला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताचे प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटलेले पाहायला मिळाले. आज पोर्शे अपघात प्रकरणावर लक्षवेधी झाली. त्यात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य प्रकारे उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. पोर्शे अपघातात आरोपीच्या वडिलांपासून ससूनहॉस्पिटलमध्ये आरोपीला वाचवण्याचे कसे प्रयत्न झाले याबाबत फडणवीसांनी निवेदन दिले. या आरोपीने भरधाव वेगाने कार चालवत दोन निष्पाप माणसाचा बळी घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.