सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा जोर पाहायला मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही म्हणावा तास पाऊस झालेला नाही. पूर्व विदर्भात अजूनही पाऊस झालेला नाही. दरम्यान आजही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने आजही राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील अनेक भागात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासन आणि सरकारतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराला देखील आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड रत्नागिरी पुणे येथील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात देखील आज पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा संकटात सापडली. पेरणीची कामे बाकी राहिली आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतकरी राजाची चिंता वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस न झालेल्या भागात देखील मुसळधार पाऊस व्हावा अशीच प्रार्थना बळीराजा व सर्व जण परमेश्वराकडे करताना दिसून येत आहेत.