जम्मू आणि काश्मीरच्या जवळ असणाऱ्या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ T -७२ रणगाड्याचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाल्याचे समजते आहे. कारण या अपघातामध्ये आपले ५ जवान शहिद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लडाखच्या दौलत बेग येथे झाला आहे. २०२० मध्ये भारतीय सैन्य आणि चीन पीएलएमध्ये याच ठिकाणी संघर्ष झाला होता. दरम्यान या अपघाताबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लष्कराचा रणगाडा प्रशिक्षणासाठी वापरला जात होता. प्रशिक्षणाचा भाग म्हणून हा रणगाडा पाण्यात उतरविण्यात आला होता. मात्र अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रणगाड्यामध्ये असणाऱ्या ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहीद झालेल्या ५ जवानांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
लडाख हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भारताचे महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी गस्त घालणे अतिशय अवघड काम असते. मात्र भारतीय सैन्य मोठ्या हिमतीने आपल्या सीमेच्या रक्षणासाठी कायम आपल्या प्राणांची पर्वा न करता उभे असतात. या ठिकाणी चीन सारख्या आपल्या कुरापती काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आपले सैन्यदले त्याला चोख प्रत्युत्तर देत असते.