काल T-20 विश्वचषकासह भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. अखेर 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देशवासियांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. देशभरात काल रात्रभर जल्लोषाचे वातावरण होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केले आहे.
टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत म्हटले आहे की,” या भव्य विजयासाठी सर्व देशवासीयांकडून खूप खूप अभिनंदन. आज १४० कोटी देशवासीयांना तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान वाटत आहे. खेळाच्या मैदानावर तुम्ही विश्वचषक जिंकलात, पण देशातील खेड्यापाड्यात आणि गल्लीबोळात तुम्ही सर्वांची मनं जिंकली आहेत”.
https://x.com/narendramodi/status/1807114429667975428
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीम इंडियाचे वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हंटले आहे की, टीम इंडियाने 17 वर्षांनंतर रोमांचक फायनलमध्ये विश्वचषक जिंकला आहे . या सामन्यात विराट कोहली, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग चमकले. या अतुलनीय विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तुमचे यश नेहमीच साजरे केले जाईल आणि कौतुक केले जाईल. आमचा कायम तुम्हाला पाठिंबा असेल आणि भविष्यातील अश्याच रोमहर्षक सामन्यांसाठी आम्ही उत्सुक आहोत”.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक्स वरील पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की , ‘T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमने अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केले. फायनल मॅचमधील विजयही असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.’
https://x.com/rashtrapatibhvn/status/1807121948951937384
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा’ म्हणत भारतीय टीमचे अभिनंदन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीम इंडियाचा हा विजय जबरदस्त असल्याचे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.”विश्व कप स्पर्धेतील जबरदस्त विजय आणि संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. सूर्या, काय जबरदस्त कॅच होता. रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्त्वाचे प्रमाण आहे. राहुल,टीम इंडियाला तुझ्या मार्गदर्शनाची उणीव भासेल, हे मला माहित आहे,’अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://x.com/RahulGandhi/status/1797979209195024720