गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी कोरोना या महामारीने अवघ्या जगाला त्रास दिला होता. दरम्यान अख्खे जग लॉकडाउनच्या विळख्यात अडकले होते. लोकांचं जीवन अवघड झालं होतं. महाराष्ट्रात भारतात जगभरात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान याच कोरोना काळामुळे भाजप आमदार जयकुमार गोरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोरोना काळात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टात जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील मायणी या गावी असलेल्या दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. मायणी खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे. हे सेंटर साताऱ्याच्या कलेक्टर यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे हे होते या काळात डॉक्टरांच्या खोट्यासह्या बनावट कागदपत्रे वापरण्यात आली. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला. अशा अनेक मुद्द्यांविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
भाजपा आमदार जयकुमार यांनी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लुबाडले 200 पेक्षा अधिक नृत्य रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांचा निधी मिळवण्यात आला. सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालय कोरोना सेंटरला मोठ्या प्रमाणावर औषधे व इतर साहित्य सामग्री पुरवली होती. मात्र जयकुमार गोरे व त्यांच्या अनेक सहकार्याने कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळण्याचा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नी तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई हायकोर्टात दीपक आप्पासाहेब देशमुख यांच्या याचिकेतून करण्यात आली आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास मुंबई हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखली व्हावा अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपटा पुढे पाच जुलैला सुनावणी होणार आहे या याचिकेमुळे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.