सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. दरम्यान आज विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल भाष्य केलं राज्य सरकारच्या वतीने गट क च्या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया यापुढे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्याच्या कॅबिनेटने गट क च्च्या जागा टप्प्याटप्प्याने एमपीएससीकडे वर्ग करणार आहे असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल.
गट क च्या रिक्त पदांसाठीची भरती एमपीएससी कडून घेतले जावी अशी लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत आपली तयारी दाखवली आहे असे देखील फडणवीस यांनी सांगितले. नोकर भरती परीक्षांमधील गैरप्रकारचा हा विषय गंभीर असून त्यामध्ये काय घडलं? त्यामागचं नरेटीव काय आहे? मागच्या सरकारच्या काळामध्ये किती पेपर फुटीचे प्रकरण झाली आणि त्यात काय फुटत याची जंत्री मी आणली आहे, असे फडणवीस म्हणाले.
पेपर फुटीच्या संदर्भात राज्य सरकारने कारवाई केली आहे केवळ एक गुन्हा दाखल झाला आहे मात्र दुसरा कुठलाही गुन्हा आतापर्यंत दाखल करण्यात आलेला नाही असं देखील देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगितलं आतापर्यंत आपण 75000 पदभरतीची घोषणा केली होती त्यापैकी सरकार आल्यानंतर 57,452 जणांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
आमच्या सरकारने तब्बल 77 हजार पेक्षा जास्त लोकांना नोकरी दिली असून त्यात कोणताही घोटाळा झालेला नाही गट क च्या पदांसाठीच्या जागा आपण टप्प्याटप्प्याने भरणार आहोत 77 हजार जणांना नोकरी देणे हा राज्याचा एक मोठा रेकॉर्ड आहे यामध्ये सर्व विभागांमध्ये समावेश आहे. आपण सर्वच विभागांमध्ये ही पदे भरली आहेत. ही नोकर भरती पारदर्शक पद्धतीने केली असून राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या 1000 रुपयांच्या फी च्या प्रश्नावर फडणवीस यांनी फी कमी करण्याचा विचार करू असे उत्तर विधानसभेत दिले.