या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला आणि खास करून भाजपला मोठा फटका बसला. संविधान बदलले जाणार हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्यामुळे तसेच अनेक मुद्द्यांवर खोटे नरेटीव पसरवल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लवकरच पुढील एक दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्या मुंबईच्या कार्यालयात भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकांवर बैठक अश्रू आहेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचे म्हटले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कशाप्रकारे जनतेसमोर जायचे कोणाला उमेदवारी द्यायची कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायची याबाबत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकांवर बैठक होत आहेत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कन्या ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. याबाबतची चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.
दरम्यान मुंबईत झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने 48 पैकी केवळ 17 जागा जिंकल्यामुळे खूप मोठा फटका राज्यातून एनडीएला तसेच महायुतीला बसलेला पाहायला मिळाला. भाजपने जवळजवळ 28 जागांवर भाजपचे उमेदवार दिले होते मात्र त्यांना यंदाच्या निवडणुकीत केवळ नऊ जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मला सरकार मधून मोकळं करा व पक्षासाठी काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडे केली होती. मात्र राज्यातील नेत्यांच्या आग्रहाखातर तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत, आगामी विधानसभा निवडणुका देखील त्यांच्याच नेतृत्वात लढविल्या जातील असे स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी तसेच खोटा नरेटीव लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणार नाही याची काळजी घेण्यासाठी तसेच केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.