लोणावळा येथील भुशी डॅम च्या बॅक वॉटर मध्ये पाच पाच जणांचे एक कुटुंब वाहून गेल्याची घटना काल घडली. यामध्ये पाच पैकी चार जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं असून एकाचा शोध सुरू आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी गेलेले एक कुटुंब त्यातील पाच जण भुशी डॅमच्या मागे असणाऱ्या धबधब्याच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर रेस्क्यू टीमला चार जणांचे मृतदेह सापडले, असून एकाचा शोध सुरू आहे दरम्यान या पाण्यातून दहा जण वाहून गेले होते. त्यापैकी पाच जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आले. तर पाच जण अडकले होते ते वाहून गेल्यानंतर चार जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश देत संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे. पुढील काही वेळातच लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल.
लोणावळ्यात उलटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यामुळे इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. रात्री गोंधळ, हुलजबाजी करणे अशा अनेक तक्रारी आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहोत तसे आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत असे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लोणावळ्यात पर्यटकांसाठी एक विशेष नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. लोणावळा खंडाळा परिसरातील निसर्ग सौंदर्य हे पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ पाडत असते. त्यामुळे वीकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा व्हायरल करण्यासाठी जे काही स्टंट केले जातात या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना देखील करण्यात येणार आहेत.