सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मगरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चिपळूम्हडून वाहणाऱ्या शिव आणि वाशिष्ठी नदीमध्ये असंख्य मगरीचे वास्तव्य असल्याचे अनेक आपल्याला पाहायला मिळाले आहे. तसेच वाशिष्ठी नदीला मिळणारी गोवळकोट खाडीमध्ये देखील मगरीचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान काळ चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात एक महाकाय मगर मोठ्या थाटात रस्त्यावरून चालतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
चिपळूण शहरातील चिंचनाका येथील मुख्य रस्त्यावर महाकाय मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मगर नागरी वस्तीत फिरणाऱ्या मगरी फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाकाय मगर रस्त्यावरून फिरत असल्याने प्रत्यक्षदर्शींची तारांबळ उडाली आहे. अनेकदा मगरी या नागरी वस्तीत शिल्र्याचे आपण पहिले आहे. मात्र एवढी मोठी मगर शहरातील मुख्य रस्त्यावर कुठून आली हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://www.instagram.com/reel/C83pojkP95u/
रविवारी रात्री म्हणजे काल अशीच एक महाकाय मग रस्त्यावर फिरताना आढळून आली. शहराच्या मधून जाणाऱ्या शिवनदीमध्ये मगरींचा वावर प्रचंड आहे. हा मगरीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, मगरींचा नागरी वस्तीतील वावर हा चिंतेचाच विषय ठरत आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी चित्रित करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.