संसदेच्या कनिष्ठ सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावालाही पंतप्रधान मोदी आज उत्तर देणार आहेत. तसेच ते .आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर आज ते दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला ते प्रतिउत्तर देतील असे सांगितले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा हे MoHFW शी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवरील आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्थायी समितीच्या 143व्या आणि 154व्या अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारशी किंवा निरीक्षणांच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत लोकसभेमध्ये आपले म्हणणे मांडतील तसेच ते आयुष मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विषयक स्थायी समितीच्या 145 व्या आणि 153 व्या अहवालात समाविष्ट असलेल्या शिफारसींच्या अंमलबजावणीची स्थिती देखील संबोधित करतील.
जेपी नड्डा, राज्यमंत्री जाधव प्रतापराव गणपतराव, जितीन प्रसाद, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राम नाथ ठाकूर, नित्यानंद राय, सत्यपाल सिंह बघेल, शोभा करंदलाजे, बीएल वर्मा, एल मुरुगन, अजय टमटा, कमलेश पासवान, रवनीत सिंग हे मंत्री देखील कागदपत्रांसह लोकसभेत संबोधित करणार आहेत.
काल विरोधी पक्षनेते यांच्या वादग्रस्त भाषणानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सभागृहांनी चर्चा सुरू केली आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधींवर टीका केली. “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
तसेच राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने नंतर पत्रकार परिषद घेतली होती.तर काँग्रेसनेही केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीका करण्यासाठी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती.