भारतीय क्रिकेट संघ 6 जुलैपासून झिम्बाब्वे विरुद्ध पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आज आफ्रिकेला रवाना झाला आहे या मालिकेत टीम इंडियाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 6 जुलैपासून या T 20 मालिकेला सुरुवात होत आहे. झिम्बॉब्वेमधील हरारे स्पोर्ट्स ग्राऊंडवर हे पाचही सामने पार पडणार आहेत. भारतीय वेळानुसार, दुपारी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. झिम्बॉबे संघाची धुरा अनुभवी सिकंदर रझा याच्या खांद्यावर असणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या अधिकृत X हँडलवर अनेक भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेला रवाना झाल्याची छायाचित्रे शेअर केली आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात चार सलामी फलंदाजांचा समावेश आहे, ज्यात T20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश आहे.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, टी-20 विश्वचषक 2024 विजेत्या संघातील 2 खेळाडू संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल हे भारतीय संघाचा भाग असतील. तर राखीव खेळाडू म्हणून रिंकू सिंग आणि खलील अहमद हे देखील टी-20 विश्वचषक संघासोबत होते. हे चार खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळणार आहेत, मात्र ते अजूनही बार्बाडोसमध्ये अडकले आहेत.आता ते भारतात पोचतील मग झिम्बाब्वेला रवाना होतील. आणि मात्र त्याआधीच उर्वरित खेळाडू पुढे निघून गेले आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.