लोणावळा येथील भुशी डॅम च्या बॅक वॉटर मध्ये पाच जणांचे एक कुटुंब वाहून गेल्याची घटना काल घडली. यामध्ये पाच पैकी चार जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं असून एकाचा शोध सुरू आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या सगळ्या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.प्रशासनाच्या या निर्णयामुळे वीकेंडला पावसाची मजा उठण्यासाठी धबधबे व पर्यटन स्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. तसेच भुशी डॅम येथे स्थानिक प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
भुशी डॅम येथे दोन कुटुंबे वाहून गेल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आदेशाला २४ तास होयच्या आतमध्येच धरणाच्या परिसरात मोठी कारवाई केली आहे. धरणपरिसरात पर्यटनाला अडचण ठरणारे स्टॉल्स, लहान हॉटेल्स आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडण्यास अतिक्रमण जबाबदार राहू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद व पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये लोणावळा येथील भुशी डॅम तसेच पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानुसार खबरदारी साठी पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय काय आहे व त्याचे नियमावली कशी असेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लोणावळा आणि तामिनी घाटातील अपघातानंतर प्रशासनाने ही महत्त्वाची पावले उचलले असून पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे धबधबे जिथे पर्यटनांची गर्दी असते असे पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पाण्याच्या प्रवाहाचा व त्याच्या खोलीचा अंदाज नाल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे तसेच भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्ग वाटा सुद्धा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.