सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरूवात झाली होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार प्रस्तावावर बोलत होते. आभार प्रस्तावावर मोदी उत्तर देत होते. मोदी बोलत असताना संसदेत विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना समाज दिली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. मोदी बोलत असताना विरोधकांनी संसदेत मणिपूर, मणिपूर अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले होते. नरेंद्र मोदींनी भारताची सुरक्षा, २१०१४ च्या आधीच भारत यावर भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
संसदेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ”२०१४ पूर्वी दहशतवादी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे हल्ला करू शकत होते. निर्दोष लोकांना मारले जात होते. भारतातील अनेक ठिकाणांना टार्गेट केले जात होते. तेव्हाचे सरकार गपचूप होते. अजितबत तोंड उघडायचे नाहीत. आताच भारत हा सर्जिकल स्ट्राईक करतो. एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याचे सामर्थ्य आताच्या भारतात आहे. ”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”आपल्या सृक्षेसाठी भारत काहीही करू शकतो हे देशातील प्रत्येकजण जाणतो. व्होट बँकेसाठी कलम ३७० चे शस्त्र वापरण्यात आले. कलम ३७० मुले जम्मू काश्मीरमधील लोकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. कलम ३७० असताना सीमेवर दगड मारले जात होते. मात्र आता कलम ३७० ची भिंत कोसळली आहे.”
आपल्या भाषणाला सुरूवात केल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा कण्र्याची संधी दिल्याबद्दल देशवासीयांची देखील आभार मानले. नेशन फर्स्ट हेच आमचे ध्येय आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.