लेबनॉन-इस्रायल सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाबाबत, लेबनीज अतिरेकी गट हिजबुल्लाहच्या उपनेत्याने असे सांगितले आहे की, गाझामध्ये पूर्ण युद्धविराम झाल्यानंतर त्यांचा गट देखील इस्रायलबरोबरचे युद्ध थांबवेल.
“जर गाझामध्ये युद्धविराम झाला तर आम्ही कोणत्याही चर्चेशिवाय युद्ध थांबवू,” असे हिजबुल्लाह चे उपनेते शेख नईम कासिम यांनी बेरूतच्या दक्षिणी उपनगरातील गटाच्या राजकीय कार्यालयात एका मुलाखतीत सांगितले आहे. .
कासिम म्हणाले की इस्रायल-हमास युद्धात हिजबुल्लाहचा सहभाग हा त्याचा मित्र हमाससाठी ‘सपोर्ट फ्रंट’ म्हणून आहे आणि जर युद्ध थांबले तर ते यापुढे लष्करी समर्थन देणार नाही. मात्र जर इस्रायलने कोणत्याही औपचारिक युद्धविराम कराराशिवाय गाझामधून आपले सर्व सैन्य मागे घेतले तर लेबनॉन-इस्रायल संघर्षाची गुंतागुंत कायम राहू शकते, असे ते म्हणाले आहेत. .
कासिम म्हणाले, जर गाझामध्ये युद्धविराम होईल की नाही, युद्ध होईल की नाही याविषयी संमिश्र मुद्दे असतील तर आम्ही त्यावर आत्ताच उत्तर देऊ शकत नाही
हिजबुल्लाह हा एक शिया इस्लामिक राजकीय पक्ष आणि लेबनॉनमधील निमलष्करी संघटना आहे, ज्याला इराणचा पाठिंबा आहे.मागच्या आठ महिन्यांपासून लेबनान बॉर्डरवर हिजबुल्लाहने इस्रायलला प्रत्युत्तर करताना दिसत आहे.लेबनान सीमेला लागून असलेल्या इस्रायली गावांमध्ये सध्या सतत हिजबुल्लाहचे रॉकेट येऊन पडतात. त्यामुळे इस्रायलने अनेकदा प्रत्युत्तराची कारवाई करताना हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.