भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA अजित डोवाल यांची ताकद वाढली आहे. त्यांनी त्यांच्या NSCS (National Security Coordination Secretariat) टीममध्ये मोठे बदल केले आहेत. आता अजित डोवाल यांना नवीन अतिरिक्त NSA मिळाले आहेत. रॉ एजन्सीचे माजी प्रमुख राजिंदर खन्ना यांना अतिरिक्त एनएसएची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी ते डेप्युटी एनएसए होते. याशिवाय दोन नवीन डेप्युटी NSA देखील नियुक्त करण्यात आले आहेत.
इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक आणि 1990 च्या बॅचचे IPS TV रविचंद्रन यांची भारताचे नवीन उप NSA म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 1990 च्या बॅचचे IFS पवन कपूर यांना देखील उप NSA बनवण्यात आले आहे. बीएसएफचे माजी प्रमुख पंकज कुमार डेप्युटी एनएसए म्हणून काम करत राहतील. आता अजित डोवाल यांच्याकडे तीन डेप्युटी एनएसए आणि एक अतिरिक्त एनएसए अधिकारी असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा केंद्रात एनडीएसाजे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी NSA अजित डोवाल यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या दोन कार्यकाळात ते NSA होते आणि या कार्यकाळात देखील NSA ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
NSCS या महत्वाच्या नियुक्त्या केल्यानंतर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयांवर पंतप्रधान मोदींची मदत करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असणार आहेत. अंतर्गत सुरक्षा आणि इतर विषय हे अतिरिक्त एनएसए राजिंदर खन्ना सांभाळणार आहेत. खन्ना हे आधी रॉ च्या ऑपरेशन डेस्कचे प्रमुख होते. पाकिस्तान आणि दहशहतवाद विरोधी विषयाचे त्यांना तज्ज्ञ समजले जाते.