आज टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बार्बाडोस येथून दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी चाहत्यांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. यानंतर आज बार्बाडोसहून परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा मुंबई विमानतळावर दाखल झाला. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान मुंबई एअरपोर्टवर भारतीय संघाचे विमान उतरताच संघाला वॉटर सलामी देण्यात आली.
https://x.com/ANI/status/1808851924692971558
मुंबईत भारतीय संघ दाखल झालं. त्यानंतर त्यांच्या विमानाला वॉटर सलामी देण्यात आली. त्यानंतर आता भारतीय संघ नरिमन पॉईंट येथे जाणार आहे. त्यानंतर एका ओपन बसमधून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत एक विजयी रॅली करणार आहेत. विजयी रॅली झाल्यानंतर भारतीय संघाचा वानखेडे स्टेडियमवर सन्मान सोहळा पार पडणार आहे. भारताने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साऊथ आफ्रिका संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून विजतेतेपदावर आपले नाव कोरले आहे. २००७ नंतर २०२४ मध्ये भारताने टी-२० वर्ल्ड कप फायनल स्पर्धा जिंकली आहे. तब्बल १३ वर्षानंतर भारताने आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
https://x.com/ANI/status/1808849778425672016
मुंबईत भारतीय संघ दाखल झाल्यानंतर आपल्या विजयी वीरांची एक झलक पाहण्यासाठी मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली आहे. चाहत्यांचा महासागर हा रस्त्याच्या दुतर्फा जमा झाला आहे. दरम्यान नागरिकांनी मरीन ड्राईव्हकडे येणे टाळावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच वाहतूक विस्कळीत होऊ नये, तसेच चाहत्यांना गैरसोय होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.