ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत लेबर पार्टी दणदणीत विजयासाठी सज्ज झाली आहे. कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने 412 जागा जिंकल्या आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी 326 जागांचा बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान पार पडले होते.
पंतप्रधान होऊ घातलेल्या स्टार्मर यांनी लेबर पार्टीला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले आहेत की, “आम्ही लोकांसाठी काम करु, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचं देखील आभार तसेच स्टार्मर यांनी आम्ही जनतेच्या मुद्यांवर बोलत राहू, जनतेसाठी दररोज लढू, बदलांसाठी तयार आहोत, असे म्हंटले आहे.
तर ऋषी सुनक यांनी आपला आणि कंझर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव मान्य केला आहे. दरम्यान ऋषी सुनक यांनी कीर स्टार्मर यांना अभिनंदनासाठी फोन केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुनक यांनी आता लंडनला जाणार असून तिथं निकालाच्या दृष्टीने चिंतन करणार असल्याचं म्हटले आहे. पंतप्रधान म्हणून मिळालेल्या कार्यकाळात खूप काम केले माझं सर्वस्व यामध्ये झोकून दिलं होते असे सुनक म्हणाले आहेत,
एक्झिट पोलने कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली होती. एका सर्वेक्षणानुसार स्टार्मरला 650 जागांच्या संसदेत 410 जागा मिळण्याची अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली होती. एक्झिट पोलनुसार, लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर हे पुढील पंतप्रधान असतील असेही जाहीर करण्यात आले होते.
ब्रिटनमधील हे सत्तांतर तब्बल १४ वर्षांनी झाले असून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा हा ऐतिहासिक पराभव असणार आहे. 2015 वगळता मागील सहा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एक्झिट पोल हे बरोबर असल्याचे सिद्ध झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत “उल्लेखनीय विजय” मिळवल्याबद्दल लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांचे अभिनंदन केले आहे.
“उल्लेखनीय विजयाबद्दल @Keir_Starmer यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा,” मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे. . “आपल्या प्रगती आणि समृद्धीसाठी.मी आपल्या सकारात्मक आणि विधायक सहकार्याची वाट पाहत आहे…
https://x.com/narendramodi/status/1809151615078727818
तसेच ऋषी सुनक यांचे एक्स वर पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी आभार मानले आहेत. “तुमच्या UK च्या प्रशंसनीय नेतृत्वासाठी आणि तुमच्या कार्यकाळात भारत आणि UK यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुमच्या सक्रिय योगदानाबद्दल धन्यवाद !. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा”.