सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर हे वाढलेले आहेत. पूर्वीपेक्षा हे दर जास्त असल्याने हल्ली नागरिक हे सीएनजी किंवा बॅटरीवरील वाहनांचा वापर करण्यावर भर देत आहेत. तर सरकारसुद्धा पेट्रोल – डिझेलसाठी दुसरे पर्यायांची चाचपणी करत आहे. यासाठी बजाज कंपनीने पुढाकार घेतला आहे. बजाज कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
लॉन्च करण्यात आलेली बाईक ही जगातील पहिली सीएनजी बाईक असल्याचे बजाजने सांगितले आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेले दुचाकीस्वार आता लवकरच या अडचणीतून मुक्त होणार आहे. कारण बजाज कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली आहे. ज्या बाईकचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झाले. या बाइकमुळे पेट्रोलच्या वाढत्या दरापासून लोकांना दुसरा पर्याय मिळेल अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
या बाईकच्या लॉन्चिंग वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ”या सीएनजी बाईकची किंमत १ लाखांपेक्षा कमी असायला हवी. भारताला प्रदूषणापासून मुक्त करणे हेच माझे ध्येय आहे. सीएनजी बाईक यासाठी मदतशीर ठरेल यात काहीच शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी सातवा क्रमांक होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी आपण तिसऱ्या नंबरवर पोहोचलो आहे. आपण उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय.”
बजाज कंपनीने जगातील सर्वात पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली आहे. एकदा टाकी फुल केल्यास ही बाईक २३० किलोमीटर धावेल असे सांगितले जात आहे. या बाईकच्या निर्मितीसाठी काम करणाऱ्या आणि लॉन्च करणाऱ्या बजाज कंपनीचे नितीन गडकरी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.