साऊथ आफ्रिकेबरोबर झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ काल भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले . कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी विश्वचषक जिंकून भारताची मान जगात उंचावली आहे. दरम्यान आज संघातील काही खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात येण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी रोहित शर्मा, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव हे विधानभवनात उपस्थित राहिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा वर्षा निवासस्थानी हे खेळाडू उपस्थित होते. यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचा सत्कार केला. या प्रसंगाचे ओशाळ मीडियाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी त्यांच्यात मराठीमध्ये गप्पा देखील झाल्या. यावेळी आमदार प्रताप सरनाईक आणि पारस भांब्रे उपस्थित होते.
काल टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बार्बाडोस येथून दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी चाहत्यांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. यानंतर काल बार्बाडोसहून परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा मुंबई विमानतळावर दाखल झाला. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान मुंबई एअरपोर्टवर भारतीय संघाचे विमान उतरताच संघाला वॉटर सलामी देण्यात आली.
मुंबईत भारतीय संघ दाखल झाल्यानंतर आपल्या विजयी वीरांची एक झलक पाहण्यासाठी मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. चाहत्यांचा महासागर हा रस्त्याच्या दुतर्फा जमा झाले होते. दरम्यान नागरिकांनी मरीन ड्राईव्हकडे येणे टाळावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले होते.