इराणसाठी मोठी आणि वाईट बातमी समोर आली असून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध लागला असून त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले होते. इराणमध्ये हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा मृत्यू झाल्यानंतर आजपासून देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुख्य लढत कट्टरपंथी आण्विक वार्ताकार सईद जलिली आणि सुधारणावादी मसूद पेजेश्कियान यांच्यात आहे.
या आधी २८ जून दरम्यान सुरुवातीच्या काळात कोणालाही ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली नव्हती. कोणालाही ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान न झाल्यामुळे इराणमध्ये पुन्हा मतदान होत आहे. तुरुंगात असलेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांच्यासह अनेकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
इराणमधील मतदारांना कट्टर माजी अण्वस्त्र वार्ताकार सईद जलिली व हृदय शल्यचिकित्सक आणि संसदेचे दीर्घकाळ सदस्य मसूद पेझेश्कियान यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. मसूद पेझेश्कियानने इराणच्या शिया धर्मशाहीत सुधारणावादी आणि उदारमतवाद्यांशी संरेखित केले आहे. देशाचे गृहमंत्री अहमद वाहीद यांच्याकडे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असून, सकाळी ८ वाजता मतदान केंद्रे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने सांगितले, “निवडणुकीची तारीख न्यायव्यवस्था, सरकार आणि संसदेच्या प्रमुखांच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. गार्जियन काउंसिलच्या प्राथमिक करारानुसार, १४ व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक २८ जून रोजी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.” तोपर्यंत प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची देशाच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली होती.. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी देशात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. भारतातही एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला आहे. या कालावधीत कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. आता २८ जून रोजी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान न झाल्यामुळे आजपासून पुन्हा मतदान सुरु झाले आहे.