इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. सुधारवादी उमेदवार डॉ. मसूद पजश्कियान(Masoud Pezeshkian ) यांनी कट्टरतावादी सईद जलिली (Saeed Jalili) यांचा पराभव करत राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे.
आयोगाचे प्रवक्ते मोहसीन इस्लामी यांनी सांगितले की, देशात ४९.८ टक्के मतदान झाले. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी सुमारे 30 दशलक्ष मते पडली. शुक्रवारच्या निवडणुकीनंतर अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या डेटानुसार, 16.3 दशलक्ष मतांसह पजश्कियान यांना विजयी घोषित केले.
इराणमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे अध्यक्षपदी असताना या वर्षी मे महिन्यात त्यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. इब्राहिम रायसी पूर्व अझरबैजान प्रांतातील एका धरणाचे उद्घाटन करून परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात राष्ट्रपती आणि परराष्ट्रमंत्र्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षासाठी निवडणुका झाल्या आहेत. .
ताब्रिझचे खासदार पजश्कियान यांना सर्वात संयमी नेता म्हणून ओळखले जाते. इराणी मीडियाच्या मते, लोक पजश्कियानकडे सुधारणावादी म्हणून पाहत आहेत. ते माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचे निकटवर्तीय मानले जातात.पजश्कियान हे माजी सर्जन असून सध्या देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी अनेकवेळा वादविवादांमध्ये हिजाबला विरोध केला आहे.