पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता वरळीमध्ये देखील हिट अँड रन अपघात घडला आहे. एका बीएमडब्ल्यू गाडीने गेलेल्या एका कुटुंबाला उडवले आहे. या अपघातामध्ये नवरा थोडक्यात वाचला आहे. तर बायकोचा म्हणजेच महिलेचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्याला फरार झाला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न झुगारता कारवाई पोलिसांनी करावी असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे ते म्हणाले आहेत.
वरळीत हा अपघात घडला आहे. बीएमडब्ल्यूच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. ज्या कुटुंबाला गाडीने धडक दिली ते कुटुंब दुचाकीवरून जात होते. तेव्हा भरधाव वेगाने गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात नवऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून तर महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून दुचाकी ताब्यात घेतली आहे.
काय आहे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण?
पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अल्पवयीन आरोपीने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला झालेली अटक, कोर्टाने सुनावलेली शिक्षा यावरून सोशल मीडियावर बरीच टीका टिपण्णी करण्यात आली होती. ३०० शब्दांचा निबंध लिहावा, नियोजन करावे अशा शिक्षा कोर्टाने त्याला दिल्या होत्या. अखेर बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्या अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध लिहिला आहे. अल्पवयीन आरोपीने ३०० शब्दांचा निबंध अखेर आपल्या वकिलांमार्फत बालहक्क न्यायालयापुढे सादर केला आहे.