राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनेचे बैठक झाली. त्या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने 1570 कोटींपेक्षा जास्तीची पगार वाढ ही जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील विभाजित निर्मिती,पारेषण व वितरण विज कंपन्या मधील ६८,०४५ हजार कर्मचारी,अभियंते,अधिकारी व सहाय्यक प्रवर्गातील कामगारांच्या पगारवाढीचा करार मार्च २०२४ पासून प्रलंबित होता. या करारवाढीच्या संदर्भात वाटाघाटीची बैठक आज ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात घेण्यात आली.
या वाटाघाटीमध्ये वीज कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये १५ टक्के व भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ देण्याबाबत त्यांनी सांगितले. यामुळे मुळवेतन व भत्ते वाढ केल्यानंतर रु.१४७० कोटी आर्थिक भार कंपन्यावर येईल हे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र कामगार संघटनांनी सरकारने केलेली वाढ असमाधानकारक असल्याचे म्हटले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
कृती समिती कामगार संघटनां व फडणवीस यांच्यात आज बैठक झाली. दरम्यानच्या काळात लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे गेले ४ महिने पगारवाढीच्या वाटाघाटी बंद होत्या. पगारवाढीचा करार तात्काळ करावा याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस प्रशासनास देण्यात आली. प्रलंबित पगारवाढ न झाल्यास ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिला होता. बैठकीमध्ये अंतिम वाटाघाटी ह्या मा.उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या पातळीवर झाल्या.कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी खालील प्रमाणे पगारवाढ जाहिर केली. ऊर्जामंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकी मध्ये खालील सहा कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
१) कर्मचारी,अभियंते व अधिकारी यांच्या मूळ वेतनामध्ये १९ % वाढ करण्यात येईल.
२) कर्मचारी,अभियंते व अधिकारी यांना सर्व अलाउन्सेस मध्ये २५ टक्के वाढ मान्य करण्यात आली.
३) ३ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना रु.५००० वाढ करण्यात आली.
४) लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रु.१००० देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
५) प्रलंबित विषयवार लवकरच अनामलिज कमिटी कालबद्ध कार्यक्रम ठरवून निर्णय घेणार.