वरळी हिट अँड रन अपघातामध्ये मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या उपनेत्याला अटक केली होती. तसेच गाडीच्या चालकाला देखील अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अजूनही फार आहे. दरम्यान आज पोलिसांनी राजेश शाह आणि गाडीचा चालक याला शिवडी कोर्टात हजर केले होते. दरम्यान कोर्टाने राजेश शाह यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज केलं. दरम्यान कोर्टाने १५,००० रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान मिहीर शाह याच्याविरोधात आता लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मिहीर शाह २४ तासांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी ६ पथके पोलिसांनी तयार केली असून अत्यंत वेगाने त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान आरोपी परदेशात पलायन करणार असल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता वरळीमध्ये देखील हिट अँड रन अपघात घडला आहे. एका बीएमडब्ल्यू गाडीने गेलेल्या एका कुटुंबाला उडवले आहे. या अपघातामध्ये नवरा थोडक्यात वाचला आहे. तर बायकोचा म्हणजेच महिलेचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
वरळीत हा अपघात घडला आहे. बीएमडब्ल्यूच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. ज्या कुटुंबाला गाडीने धडक दिली ते कुटुंब दुचाकीवरून जात होते. तेव्हा भरधाव वेगाने गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात नवऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून तर महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून दुचाकी ताब्यात घेतली आहे. वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न झुगारता कारवाई पोलिसांनी करावी असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे ते म्हणाले आहेत.