वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह अद्याप फरार आहे मात्र दुसरीकडे वरळी हिट अँड रन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.या विभागाकडून जुहू येथील व्हाइस ग्लोबल तापस बार सील करण्यात आला असून या प्रकरणात बार मालकासह काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
हा जुहू येथील तोच बार आहे जिथे या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहने त्याच्या चार मित्रांसह पार्टी केली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारला चार दरवाजे असून ते सर्व उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहेत. घटनेपूर्वी या प्रकरणातील आरोपी मिहीर शाहने आपल्या चार मित्रांसह तेथे पार्टी केली होती. पार्टीनंतर शाह बारमधून बाहेर पडला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मित्रांसोबत कारमधून जाताना दिसला होता.
बारमध्ये काम करणारे 60 कर्मचारी, पोलिसांनी बार मालकासह काहींची चौकशी करण्यात येत आहे. रविवारी वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर कारने स्कूटरला धडक दिल्याने बेपत्ता असलेल्या मिहीर शाहला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 14 पथके तयार केली आहेत. फरार असलेल्या मिहीर साठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
7 जुलै रोजी मिहीरचे वडील राजेश शहा आणि राज ऋषी राजेंद्र सिंह विडावत यांना पोलिसांना सहकार्य न केल्याने अटक करण्यात आली होती.
कावेरी नाखवा असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४५ वर्षीय महिलेचे नाव असून ती वरळी कोळीवाडा येथील रहिवासी आहे. ती तिच्या पतीसोबत स्कुटरवरून जात होती.या अपघातादरम्यान पतीने उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र अपघातात जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
ही आलिशान कार महाराष्ट्रातील पालघर येथील शिवसेनेच्या नेत्याची असल्याची माहिती समोर आले आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका १७ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत चालविलेल्या एका पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर काहीच दिवसात ही घटना घडली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राज्यातील “हिट अँड-रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.