भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या बंगळुरू येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विराट कोहलीच्या मालकीचे असलेल्या One8 Commune रेस्टॉरंट आणि पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पब वेळेत बंद करण्याचा नियम न पाळल्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असू, त्याविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे.
बंगळुरू शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत पब सुरू ठेवल्यामुळे ३ ते ४ पबवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये विराट कोहलीच्या मालकीच्या पब चा देखील समावेश आहे. मोठया आवाजात गाणी वाजवल्याची तक्रार मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. बंगळुरू शहरात रात्री १ पर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र त्यानंतरही पब सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली.