अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कोट्यवधी रुपयांच्या व्हॅट घोटाळ्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून हरियाणामध्ये 14 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या चंदीगड झोनल कार्यालयावर छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमध्ये हरियाणा सिव्हिल सर्व्हिसचे तीन अधिकारी आणि त्यांच्यासोबत या घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अनेक व्यक्तींना आता लक्ष्य करण्यात आले आहे.
अशोक सुखीजा, नरेंद्र कुमार रंगा आणि गोपी चंद चौधरी या तीन हरियाणा सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांची ईडीने छापेमारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोध मोहिमेचा उद्देश या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग आणि इतर आर्थिक अनियमिततेचे पुरावे शोधणे आहे. ईडीचे अधिकारी कथित फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे आणि रेकॉर्डसाठी परिसराची चाचपणी करत आहेत.
मूल्यवर्धित कर (व्हॅट) घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीचे महत्त्वपूर्ण आर्थिक नुकसान झाल्याचे मानले जात आहे. अंदाजे 70 कोटी रुपयांची ही अफरातफर असल्याचे सांगितले जात आहे.
हरियाणा पोलिसांनी हरियाणा शहरी विकास प्राधिकरण (HSVP) आणि घोटाळ्याच्या संबंधात इतर आरोपींविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवल्यानंतर ईडीची कारवाई सुरु झाली आहे.