नेपाळमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच 2000 हून अधिक घरांचे नुकसान झाल्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार नेपाळमध्ये यंदा अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरू असून अनेक
ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये पुराचा परिणाम दिसून येत आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, यावेळी पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, काठमांडूमध्ये एक, कोसी राज्यात 19, मधेस राज्यात 3, बागमती राज्यात 4, गंडकी राज्यात 22, लुंबिनी राज्यात 20, कर्णाली राज्यात 4 आणि सुदूरपश्चिम राज्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, काठमांडूमध्ये 5, कोसी प्रदेशात 25, मध्य प्रदेशात 9, बागमती प्रदेशात 7, गंडकी प्रदेशात 32,लुंबिनी प्रदेशात 13, कर्णाली प्रदेशात 19 आणि सुदूर पश्चिम प्रदेशात 31 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे 5 जण बेपत्ता असल्याची असून त्यांचा शोध सुरू आले.
नेपाळी गृहमंत्रालयानुसार, पुरामुळे आतापर्यंत 2000 हून अधिक घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे, तर 161 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे विविध नद्यांना पूर आल्याने 41 छोटे-मोठे पूल कोसळल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
पुरामुळे एका सरकारी शाळेची इमारत आणि दोन सरकारी कार्यालयांच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे. तसेच आतापर्यंत 384 प्राणी वाहून गेल्याची माहितीही देण्यात आली आहे.