Argentina vs Canada: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाच्या संघाने काल मेटलाइफ स्टेडियमवर फुटबॉलच्या कोपा अमेरिका 2024 च्या (Copa America 2024 ) उपांत्य फेरीत कॅनडाचा 2-0 असा पराभव केला.
अर्जेंटिनाने स्पर्धेची सलग दुसरी अंतिम फेरी गाठली आहे.आता अर्जेंटिनाचा सामना रविवारी मियामी गार्डन्स, फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत उरुग्वे किंवा कोलंबिया यापैकी उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.
अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघासाठी ही 30वी अंतिम फेरी गाठण्याची विक्रमी नोंद असेल.लिओनेल मेस्सीचा संघ सलग तिसऱ्यांदा मोठ्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.अल्बिसेलेस्टेने अंतिम फेरीत ब्राझीलचा 1-0 असा पराभव करत 2021 ला कोपा अमेरिका जिंकली होती
कॅनडाच्या संघाविरुद्धच्या सामन्यात ह्यावेळी अर्जेंटिना सुरुवातीपासूनच आरामात खेळताना दिसत होता. त्यांनी संधी निर्माण करून प्रतिस्पर्ध्याच्या गोलवर सुरुवातीपासूनच आक्रमण केले.
मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर ज्युलियन अल्वारेझने 22 व्या मिनिटाला दोघांना मात करत आपल्या राष्ट्रीय संघासाठी पहिला गोल केला आणि त्याला रॉड्रिगो डी पॉलने मदत केली.
कर्णधार लिओनेल मेस्सीने 51व्या मिनिटाला गोल करत संघाचा आत्मविश्वास वाढवला. चेल्सीचा मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसने 37 वर्षीय खेळाडूला गोल करण्यात मदत केली. या गोलसह, मेस्सीने त्याची आंतरराष्ट्रीय गोल संख्या (109) इराणच्या अली दाईच्या 108 च्या पुढे वाढवली, ज्यामुळे तो क्रिस्टियानो रोनाल्डो (130) नंतर दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. कोपा अमेरिकेच्या इतिहासातील मेस्सीचा हा 14वा गोल होता.
इतिहासातील आतापर्यन्त केलेले फुटबॉल मधले सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल खालीलप्रमाणे आहेत. :
1. क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल): 130 गोल
2. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना): 109 गोल
3. अली दाई (इराण): 108 गोल
4. सुनील छेत्री (भारत): 94 गोल
5. मुख्तार दाहारी (मलेशिया): 89 गोल
6. अली माबखौट (यूएई); रोमेलू लुकाकू (बेल्जियम) : ८५ गोल
7. फेरेंक पुस्कास (हंगेरी): 84 गोल
8. रॉबर्ट लेवांडोव्स्की (पोलंड): 83 गोल
9. गॉडफ्रे चितलू (झांबिया); नेमार (ब्राझील) : ७९ गोल
10. हुसेन सईद (इराक): 78 गोल.