पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मॉस्कोला पोहोचले आहेत. दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी झाले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्को येथील भारतीय समुदायाला संबोधित देखील केले आहे. दरम्यान रशियात असलेले भारतीय सैनिक लवकरच भारतात परतणार आहेत. रशियन सैन्यात अडकलेल्या गगनदीप सिंगचे वडील बलविंदर सिंग म्हणाले की, युद्धग्रस्त रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आता आशेचा किरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान भारतीय नागरिकांची रशियन सैन्यात भरती केल्याच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आणि रशियन सरकारने या भारतीयांना लष्करी सेवेतून “लवकर डिस्चार्ज” करण्याचे आश्वासन दिले आहे. सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी मंगळवारी सांगितले.
एएनआयशी केलेल्या संवादामध्ये बलविंदर सिंग म्हणाले, “माझ्याकडे अनेक मीडिया रिपोर्ट्स आले आहेत आणि मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला भेट दिल्याचे कळले आहे. अगदी माझ्या मुलाने मला फोनवर सांगितले की, पंतप्रधान मोदी रशियाला पोहोचले आणि त्यांनी सरकारशी चर्चा केली. अडकलेल्या भारतीयांची सुटका होण्यासाठी आशेचा किरण मला आता दिसत आहे.”
पीएम मोदींनी युक्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करत ही युद्धाची वेळ नसल्याचे सांगितले. त्याचवेळी, पीएम मोदींनी युक्रेन युद्धावर राजनयिक तोडगा काढण्यावर भर दिला आणि रशियाच्या अध्यक्षांना सांगितले की, ‘युद्धभूमीवर तोडगा निघू शकत नाही. रशिया आणि ऑस्ट्रियाच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.