धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाचा तिसरा टप्पा आजपासून तात्पुरता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
हाजी अली ते वरळीतील खान अब्दुल गफार खान ,मार्गापर्यंत जोडणारा जो लोटस जेटी जंक्शनपासून उत्तरेकडील लेनवरील हाजी अली येथील मुख्य पुलापर्यंत जातो, असा हा तिसरा टप्पा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी शनिवार आणि रविवारी रस्ता बंद राहणार आहे. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा हाजी अली आणि वरळीला जोडणारा उत्तरेकडील 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे., या नवीन मार्गाने प्रवाशांना सागरी सेतूवर जाता येणार आहे. चौथा टप्पा तीन आठवड्यांत पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. ज्यामुळे वाहचालकांना मरीन लाइन्स ते वांद्रे अंतर अगदी कमी वेळेत गाठता येईल
हा रस्ता आज प्रवाशांसाठी खुला करण्याआधी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ अमित सैनी, मुख्य अभियंता (मुंबई कोस्टल रोड प्रकल्प) गिरीश निकम, उपमुख्य अभियंता मंत्यय्या स्वामी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
10 जून रोजी, वरळी ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले होते.हाजी अली आणि अमरसन्सपासून हा रस्ता 6.25 किमी आहे.
तर पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. .
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 2022-23 च्या बजेटमध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी 3200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, कोस्टल रोड प्रकल्पाला बीएमसीकडून 2022-23 या वर्षासाठी बजेट वाटपाचा सर्वाधिक वाटा 17 टक्के,देण्यात आला आहे.