आज राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १२ जागांवर महायुतीचे ९ उमेदवार तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. मात्र काँग्रेसचे काही आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे ८ आमदार फोडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. दर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या जामिनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे सध्या जामिनावर बाहेर होते. आज विधानपरिषदेची निवडून होत असतानाच त्यांच्या जामिनाचा देखील शेवटचा दिवस आहे. दरम्यान जामिनाची मुदत वाढवून मिळावी यासाठी मलिक यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने जामिनास मुदत न दिल्यास मलिक यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल.
गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. २०२३ ऑगस्टमध्ये ते अटीशर्तींसह जामिनावर बाहेर आले होते. प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जामीन देण्यात आला होता. दरम्यान नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणजेच अजित पवारांसोबत असल्याचे आपण पहिले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसलेले पाहायला मिळाले होते.
मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु देश महत्वाचा असे म्हणत मलिकांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांतून त्यांची मुक्तता झाल्यास आपण जरूर त्यांचे स्वागत करावे मात्र तूर्तास हे आरोप असे पर्यंत त्यांना महायुतीचा भाग न करणे योग्य ठरेल असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.