आज राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १२ जागांवर महायुतीचे ९ उमेदवार तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. मात्र काँग्रेसचे काही आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे. प्रत्येक पक्षाने आपली मते फुटू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. दरम्यान भाजपचे आमदार गणपत गायकवाड जे तुरुंगात आहेत, त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
थोड्याच वेळात विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २७४ आमदारांनी आपले मतदान पूर्ण केले आहे. महायुतीने ९ आणि महाविकासआघाडीने ३ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत २०२२ प्रमाणे देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार याकडे सवांचे लक्ष लागले आहे. २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या कमालीच्या नियोजनामुळे जास्तीचा उभा केलेला उमेदवार निवडून आणला होता. दरम्यान आताच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने फडणवीसांवर एक मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील फडणवीसांची जादू चालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.