आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान आता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. भाजपचे योगेश टिळेकर हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. पंकजा मुंडे यांना १८ मते आतापर्यंत मिळाली आहे.
दरम्यान पहिला निकाल समोर आला आहे. महायुतीचे आणि भाजपाचे उमेदवार योगेश टिळेकर हे विजयी झाले आहेत.
भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे देखील विजयी झाल्या आहेत.
त्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार परिणय फुके देखील विजयी झाले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे आता २२ मतांवर पोहोचले आहे. त्यांना विजयासाठी एका मताची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झालेला आहे.
शिवसेनेच्या भावना गवळी देखील विजयी झाल्या आहेत.
महाविकास आघाडीने देखील आपले खाते उघडले असून, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव देखील विजयी झाल्या आहेत.
शिवसेनेचे कृपाल तुमाने देखील विजयी झाले आहेत.
महायुतीचे विजयी उमेदवार
पंकजा मुंडे
सदाभाऊ खोत
परिणय फुके
अमित गोरखे
योगेश टिळेकर
शिवाजीराव गर्जे
राजेश विटेकर
भावना गवळी
कृपाल तुमाने
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव