काल महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र जयंत पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. महायुतीमध्ये भाजपाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. तसेच काँग्रेसची देखील काही मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत.
पंकजा मुंडे
सदाभाऊ खोत
परिणय फुके
अमित गोरखे
योगेश टिळेकर
शिवाजीराव गर्जे
राजेश विटेकर
भावना गवळी
कृपाल तुमाने
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव
मिलिंद नार्वेकर
पराभूत उमेदवार (महाविकास आघाडी)
जयंत पाटील (शेकाप)