हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी जॉर्ज सोरोस यांच्यावर युरोप देश हा मुस्लिमांनी भरून टाकण्याच्या योजना असल्याचा गंभीर आरोप केला आहे . पंतप्रधान ओर्बन यांनी दावा केला आहे की सोरोस यांनी युरोपियन युनियनचे अनेक खासदार विकत घेतले आहेत. जेणेकरून ते मुस्लिम आणि इतर घुसखोरांच्या बाजूने कायदे करू शकतील. त्यामुळे हंगेरीत राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन म्हणाले, “जॉर्ज सोरोस यांना युरोप मुस्लिमांनी भरून टाकायचा आहे. त्यांनी युरोपियन युनियनच्या अनेक खासदारांना पैसे देऊन आपल्या बाजूला आणले आहे. ते युरोपियन युनियनमध्ये मुस्लिम आणि घुसखोरांना अनुकूल असे कायदे मंजूर करत आहेत.” ऑर्बन यांनी विशेषतः ग्रीस, हंगेरी आणि ऑस्ट्रियासारख्या देशांचा उल्लेख केला आहे. जेथे मुस्लिम लोकसंख्येचे पुनर्वसन करण्याच्या योजना सुरू आहेत. ते म्हणाले की, युरोपची सामाजिक रचना बदलण्यासाठी ही जाणीवपूर्वक आखलेली रणनीती आहे.