कोकणात सध्या अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, महामार्गावर पाणी येणे अशा घटना घडत आहेत. दरम्यान चेपून शहरात एक मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कॉलेजची सरंक्षक भिंत कोसळली. यामध्ये गाडला गेल्यामुळे या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेला विद्यार्थी बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता. अखेर या मातीखाली त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी पोचले असून, पुढील कारवाई केली जात आहे.
कोकण किनारपट्टीवर सुमद्राला उधाण आलेले आहे. किनारी भागातील आणि महत्वाच्या भागात एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर वाढल्यास समुद्र अजून खवळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी सुरू आहे.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. तळकोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे.