अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच आगामी निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर सभेमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारादरम्यान, ड्रम्प यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एक गोळी ड्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली. यामुळे ट्रम्प किरकोळ जखमी झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. रॅलीमध्ये अनेक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने डोनाल्ड ट्रम्प लागलीच व्यासपीठाच्या मागे लपले. दरम्यान त्यांच्या डाव्या कानाला बंदुकीची गोळी लागून गेली आहे. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यांच्या कानाला जखम झाल्याचे दिसत आहे.
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजूबाजूला उपस्थित गुप्तहेर खात्याने लगेच डोनाल्डर ट्रम्प यांना सुरक्षित केले. त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते. ते उभे राहून हात उंचावताच गर्दीतून आवाज आला. त्यानंतर काही वेळातच ते तेथून निघून गेले. सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितले की संरक्षणात्मक उपाय लगेचच लागू केले गेले आहेत आणि ट्रम्प सुरक्षित आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे आणि जसजशी ती उपलब्ध होईल तसतसे अधिक माहिती जाहीर केली जाईल. माजी राष्ट्रपतींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सीक्रेट सर्व्हिसने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.