महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे, अश भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. तसेच महाराष्ट्र पर्यटनामध्येही देशातील नंबर एकचे राज्य बनेल, असेही ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान काल पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते मुंबईतील 29,400 कोटींच्या वेगवेगळ्या लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यात मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी चांगली होईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात रोजगार निर्मितीमध्येही हातभार लागेल, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या नंतर राज्यात मोठ्या संख्येने रोजगाराची निर्मिती होणार आहे. तुम्ही पेपर पाहिले असतील, दोन-तीन आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वधावन बोर्डलाही स्वीकृती दिली आहे. 76 हजार कोटी रुपये या प्रकल्पाने राज्यात 10 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होईल, असे मोदी यांनी सांगितले.
खोटे नरेटिव्ह सेट करणारे गुंतवणुकीचे दुश्मन!
मोदी पुढे म्हणाले, रोजगारावरून खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांची बोलती बंद केली. खोटे नरेटिव्ह सेट करणारे गुंतवणुकीचे दुश्मन आहेत. इन्फ्रास्ट्रकरच्या निर्मितीतील दुश्मन आहेत, भारताच्या विकासाचे दुश्मन आहे. यांचं धोरण तरुणांचा विश्वासघात आणि रोजगार रोखणारी आहे. त्यांची पोलखोल होत आहे. त्यांचे खोटेपण उघड होत आहे. पूल तयार होत असेल, रेल्वे ट्रॅक होत असेल रोड होत असेल तर कुणाला तरी रोजगार मिळतोच. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची गती वाढत आहे, तसेच रोजगाराची गतीही वाढत आहे. येत्या काळात अधिक संधी निर्माण होणार आहे.
एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, हे लोक जाणून!
गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश-विदेशातील गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे उत्साहाने स्वागत केले आहे. एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, स्थायित्व देऊ शकतं हे लोक जाणून आहे. तिसऱ्या कार्यकाळामध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करेल असं मी सांगितलं होतं. आज ते आपण होत असलेले पाहत असल्याचे मोदी म्हणाले.
महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठा आर्थिक पॉवर हाऊस बनवण्याचे लक्ष्य !
राज्याकडे गौरवशाली इतिहास आहे. राज्याकडे सशक्त वर्तमान आहे आणि राज्याकडे समृद्धी भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीत मोठं योगदान असलेलं राज्य आहे. राज्याकडे इंडस्ट्रीची पॉवर आहे, कृषी पॉवर आहे, राज्याकडे आर्थिक सेक्टरची ताकद आहे. या ताकदनेच मुंबईला देशाचा फायनान्शियल हब केलं आहे. आता महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठा आर्थिक पॉवर हाऊस बनवण्याचं माझं लक्ष्य असल्याची घोषणा मोदींनी केली.
भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचे काम महाराष्ट्र करतोय !
माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. महाराष्ट्र पर्यटनामध्ये भारतातील नंबर एकचे राज्य बनावे . या ठिकाणी शिवाजी महाराजांचे शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची शक्यता आहे. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.