देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्ससह ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक फॉलो करण्यात आलेले नेते बनले आहेत.
एक्सवर अकाउंट असलेल्या विविध भारतीय राजकारणी व्यक्ती बघता पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
विरोधी पक्षनेते (LoP), राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे 19.9 दशलक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे 7.4 दशलक्ष अनुयायी आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे 6.3 दशलक्ष, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे 5.2 दशलक्ष, तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे 2.9 दशलक्ष अनुयायी आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ज्यांचे सध्या 38.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर दुबईचे विद्यमान शासक एच एच शेख मोहम्मद (11.2 दशलक्ष) आणि पोप फ्रान्सिस (18.5 दशलक्ष) यांच्यासह इतर जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी खूप पुढे आहेत.
भारतीय खेळाडू विराट कोहली (64.1 दशलक्ष), ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार जूनियर (63.6 दशलक्ष) आणि अमेरिकन बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (52.9 दशलक्ष) फॉलोअर्ससह काही सक्रिय जागतिक खेळाडूंच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे अनुयायी जास्त आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत, पीएम मोदींच्या एक्स हँडलला अंदाजे 30 दशलक्ष फॉलोअर्सची वाढ झाली आहे. हाच प्रभाव पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर देखील आहे, जिथे त्यांचे अनुक्रमे 25 दशलक्ष फॉलोअर्स आणि 91 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
एक्सवर टाकलेल्या वैयक्तिक अनुभवांच्या तसेच वैशिठ्यपुर्ण फोटो आणि माहिती असणाऱ्या पंतप्रधानांच्या पोस्टनी जगभरातील लाखो लोकांना मोहित केले आहे. सोशल मीडियावर पीएम मोदींची लोकप्रियता पाहून जागतिक नेते सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्यास उत्सुक असल्याचे नेहमीच दिसून येते.